कतरिनाने दाखवले मेंदी रंगलेले हात! ‘इथे’ लिहिलंय विकीचं नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vicky kaushal katrina kaif wedding

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांचा विवाह नुकताच पार पडला. राजस्थानच्या एका हेरिटेज हॉटेलमध्ये या दोघांनी राजेशाही थाटात लग्न केलं.

लग्नानंतर त्यांचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. लग्न सोहळ्यापासून ते लग्नानंतरच्या चुल्हा चढाना या विधींचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. याच दरम्यान कतरिनाने अजून एक फोटो शेअर केला असून त्यात तिचे मेंदी काढलेले हात दिसत आहेत.

असं म्हणतात की मेंदी जितकी रंगेल तितकं पतीचं प्रेम असतं. कतरिनाची मेंदी देखील खूप सुंदर रंगलेली पाहायला मिळत आहे. सोजत येथील प्रसिद्ध मेंदी तिच्या हातावर रंगलेली दिसत आहे.

नवरीच्या हातातील मेंदीत नवऱ्याचं नाव लपवण्याची पद्धत आहे. कतरिनाच्या मेंदीत देखील विकीचं नाव लपलेलं आहे. तिच्या उजव्या हाताच्या अनामिकेवर विकीचं नाव लिहिण्यात आलं आहे. हा फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)