‘केबीसी’च्या प्रोमोमध्ये रोहन-विनायकची जादू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोच्या 15 व्या सीझनच्या नवीन प्रोमोने सगळय़ांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन म्हणतात, ‘बदल रहा है देश, बदल रहा है कौन बनेगा करोडपती.’ या प्रोमोचे काव्यात्मक संवाद रोहन-विनायक यांनी स्वरबद्ध केले आहेत आणि या रिऑलिटी क्विझ शोच्या चालीला अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला आहे.

संगीतकार रोहन-विनायक यांनी अमिताभ बच्चन यांच्या पिंक, सरकार 3 आणि 102 नॉट आऊट या चित्रपटांना संगीत दिले आहे. आता कौन बनेगा करोडपतीच्या थीम म्युझिकमध्ये त्यांनी नवीन प्राण फुंकले आहेत. या रचनेविषयी रोहन-विनायक म्हणाले, ‘अगदी लहान असल्यापासून आम्ही अमिताभ बच्चन यांचे चाहते आहोत. त्यांच्या आवाजातील मोहिनी देशाला एकत्र आणू शकते. त्यामुळे आम्ही दोघांनी खूप विचार केला आणि शेवटी आम्हाला ही युक्ती सुचली की, जो या शोचा चेहरा आहे तोच या व्हिडीओचा आवाजही असावा.’ ‘नए अरमान, नई मुस्कान, नए आसमान लिए’ असा संदेश देत केबीसी 15 लवकरच नव्या रूपात येणार आहे.