संभाजीनगरात भव्य कावड यात्रेला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

श्रावणी शनिवारनिमित्त संभाजीनगरात भव्य कावडयात्रेला सुरुवात झाली आहे. ‘हर हर महादेव’च्या गजरात कावडयात्रेला सुरुवात झाली. शिवसेनेच्या कावड यात्रेसह शहरात विविध ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या कावड यात्राही उत्साहात सुरू झाल्या आहेत. यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.

गेल्यावर्षी 151 फूटांची कावड हे यात्रेचे आकर्षण होते. यंदा 501 फूटांची भव्य कावड बनवण्यात आली आहे. सुमारे दीड हजार तरुण ही कावड खाद्यांवर घेणार आहेत, असे यात्रेचे मुख्य संयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले. हर्सूल येथील हरसिद्धी मातेच्या मंदिरातून यात्रेला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध ठिकाणांहून यात्रा शहाराचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर महादेव मंदिरात पोहचणार आहे. तेथे पर्जन्यवृष्टीसाठी महाआरती करण्यात येणार आहे. या यात्रेत लाखो भाविकांसह अनेक संस्थाही सहभागी होणार आहेत.