
लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवला होता. मात्र, त्यावर अद्यापही भाजपने निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांना विधानसभेपर्यंत तरी उपमुख्यमंत्रीपदी कायम ठेवावं, जेणेकरून महाविकास आघाडीचा फायदा होईल, असा खोचक टोला लगावला आहे.



























































