केगावकरांनी सिडकोच्या पथकाला पिटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नौदलाच्या उरण येथील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील आरक्षित सेफ्टी झोनमध्ये 25 हजारांहून अधिक घरे आहेत. आरक्षणाच्या आधीपासूनच असलेल्या घरे व बांधकामाच्या फाइलवर अद्यापही कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आरक्षित सेफ्टी झोनची फाइल दिल्लीत धूळखात पडून आहे. असे असताना आज सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे पथक बांधकामे पाडण्यासाठी आले होते. मात्र संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून कारवाई रोखली.

घरांचे पाडकाम करण्यासाठी सिडकोचे अधिकारी अमित राजपूत पथकासह आले होते. पथकाने एका घराभोवती असलेली संरक्षक भिंत पाडून टाकली. कारवाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य व घर बचाव समितीचे अध्यक्ष महेश म्हात्रे यांनी सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला.