अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या नऊ दिवसांपासून दिल्ली येथे सुरू असलेले अरविंद केजरीवाल यांनी आपले धरणे आंदोलन मागे घेतलं आहे. आंदोलन मागे घेतल्यानंतर काही वेळातच ते आयएएस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, गोपाल राय आणि सत्येंद्र जैन हे दोन मंत्री नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करत होते.

हे आंदोलन त्यांनी ‘एलजी दिल्ली छोडो’ या मोहिमेअंतर्गत केले होते. राज्यपालांच्या कार्यपद्धतीला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी ‘एलजी दिल्ली छोडो’ ही मोहीम उघडली होती. दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांचा सुरू असलेला संप थांबवण्यात यावा, अशीही त्यांनी मागणी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने या धरणे आंदोलनावरून केजरीवाल यांची खरडपट्टीही काढली होती. कोणाच्याही कार्यालयात घुसखोरी करणं म्हणजे धरणे आंदोलन नाही, असं न्यायालयाने म्हटलं होतं.