
केरळमधील दोन महिलांच्या नरबळी प्रकरणात दररोज नवनवे खुलास समोर येत आहेत. आता पोलीस चौकशीत एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दाम्पत्याने बळी दिलेल्या एका महिलेचे मांस शिजवून खाल्ले होते. तसेच पैसाप्राप्तीसाठी आरोपी महिला ही तिच्या पतीसमोरच तांत्रिकासोत सेक्स करायची.
केरळ मधील पथानामथिट्टा भागात एका जोडप्याने तांत्रिक शफीच्या मदतीने दोन महिलांचा नरबळी दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघड झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी लैला व तिचा पती भगवल सिंह आणि तांत्रिक शफी यांना अटक केली आहे. शफीने भगवल सिंह यांच्याशी फेसबुकवरून महिला बनून मैत्री केली होती. त्यानंतर ते एकमेकांशी चॅट करू लागले. भगवलला पैशांची चणचण असल्याचे त्याने त्या महिलेला सांगितले होते. तिने त्याला एका बाबाचा नंबर दिला. त्यानंतर शफी हा तांत्रिक बनून त्यांना भेटला. त्याने सुरुवातीला आर्थिक चणचण दूर व्हायची असेल तर लैलाला त्याच्याशी सेक्स करावा लागेल असे सांगितले. त्यासाठी भगवल व लैला तयार झाले. त्यानंतर शफीने भगवलला बांधून ठेवले व त्याच्या डोळ्या देखत लैलासोबत सेक्स केला.
मात्र हे करूनही परिस्थिती सुधारत नसल्याने शफीने त्यांना दोन नरबळी देण्यास सांगितले. त्यासाठी बायका देखील शफीनेच आणल्या. त्या बायकांना शफीने पॉर्न चित्रपटात काम करण्याचे दहा लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हावेपोटी त्या दोघीही शफीसोबत भगवल यांच्या घरी आल्या. तिथे त्या दोघींची हत्या करण्यात आली. भगवल, लैला व शफी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एका महिलेचे मांस चक्क शिजवून खाल्ले देखील.


























































