संजू सॅमसन ठरला सर्वात महागडा खेळाडू, आता या लीगमध्ये धमाका करणार!

राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा कर्णधार संजू सॅमसन आता मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. IPL मध्ये त्याचा खेळ सुमार राहिला होता. तसेच दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगामात फक्त 9 सामने खेळला होता. ज्यामध्ये त्याने 285 धावा केल्या होत्या. परंतु आता संजू केरल क्रिकेट लीग (KCL 2025) मध्ये तोडफोड फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो KCL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

केरळ क्रिकेट लीगची तिरुवनंतपुरम येथे लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत संजू सॅमसनला कोच्ची ब्लू टायगर्स या संघाने 26.80 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली. KCL च्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. त्यामुळे संजू सॅमसन KCL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये संजू सॅमसनची मुळ किंमत 5 लाख रुपये होती. तसेच प्रत्येक संघाच्या पर्समध्ये 50-50 लाख रुपये होते. म्हणजेच एका संघाच्या पर्सची अर्धी रक्कम संजू सॅमसनच्या नावावर झाली आहे. मागील हंगामात संजू सॅमसन केसीएलमध्ये खेळला नव्हता. परंतु यंदा आपल्या फलंदाजीचे जलवे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न राहिलं. 21 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान केसीएलचा थरार रंगणार आहे.