मराठी भाषिकांचे लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी सायगावकर यांचे निधन

619

1956 च्या कर्नाटक निर्मितीनंतर भाषिक अन्यायग्रस्त बेळगांव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात अग्रेसर राहिलेले तथा जुलमी निजामशाही विरोधात लढलेले स्वातंत्र्यसेनानी यशवंत केशवराव पवार-सायगावकर यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात वृध्दपकाळाने मंगळवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव शरीर भालकी तालुक्यातील मुळ गावी सायगाव येथे आणण्यात येणार असून त्यांच्यावर बुधवारी दुपारी 1 वाजता अंत्यसंविधी करण्यात येणार आहे.

यशवंतराव सायगावकर यांचे आर्य समाज या हिंदू संघटनेतही महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून भालकी विधानसभा मतदारसंघातून मातब्बर समजले जाणारे भिमन्ना खंड्रे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. केवळ 265 मतांनी ते विजयापासून दूर राहिले होते. त्यांच्या हयातीत बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी महाराष्ट्रात येण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिल्याने मराठी भाषिकांमध्ये त्यांच्या दु:खद निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, तीन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या