महामार्गावर कशेडी घाटात सापडला सोनेरी रंगाचा दुर्मिळ कोळी

684

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी पाटात सोनेरी रंग असलेल्या दुर्माळ कोळी (स्पायडर) आढळून आला आहे. हा दर्मिळ कोळी कशेडी घाटात कसा आला. आपल्या भागात अशा प्रकाराचा कोळी आढळतो का? हे पाहण्यासाठी आता किटक अभ्यासकांची मदत घेतली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे प्रवेश द्वार असलेलल्या कशेडी घाट येथे पोलीस

बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खेड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरिक्षक या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना त्यांना हा सोनेरी रंगाचा दुर्मीळ कोळी आढळून आला. कोकणात आतापर्यंत दोन प्रकारचे कोळी आढळून आले आहेत. आपले घर किंवा आजुबाजुच्या परिसरात तंतूचे जाळे विणणारा कोळी. हा कोळी आकाराने लहान असतो तर दुसरा रानात दोन झाडांच्या मध्ये जाळे विणून राहणारा कोळी. हा कोळी आकाराने मोठा असतो. मात्र या दोन्ही कोळ्यांचा रंग एकसारखाचा असतो. पोलीस उपनिरिक्षक कदम यांना आढळून आलेला हा कोळी रंगाने अगदीच वेगळा असल्याने हा कोळी नेमका आपल्या भागात आला कुठून याचा शोध घेतला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या