राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचा धमाका महाराष्ट्रात, राज्य स्पर्धा विरारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्पर्धेआधी 57 वी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा, विरार, जिल्हा पालघर येथे 10 ते 13 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. सदर स्पर्धा ओल्ड विवा काॅलेजमागील मैदान, विवा काॅलेज रोड, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर येथे होणार असून 24 जिह्यांतील पुरुष व महिला संघ या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सहभागी होतील असे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी कळविले आहे.

युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांच्या हस्ते मराठी उद्योजक प्रशांत चाचड यांच्या ‘सर्वेश्वर फिटनेस’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचा श्रीगणेशा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र सचिव किरण सुर्वे, स्वराज युथ पह्रमचे अध्यक्ष चेतन कोरगावकर, उपविभागप्रमुख महेश पेडणेकर, नगरसेविका अनुराधा पेडणेकर, शरीरसौष्ठव क्षेत्रातील गुरू प्रवीण सकपाळ, मनीष आडविलकर, स्वप्नील कदम हे मान्यवर उपस्थित होते. मुंबई उपनगर जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमोल कीर्तीकर यांचा स्वराज युथ पह्रमच्या वतीने सत्कारही यावेळी करण्यात आला.