खोखोचा चालताबोलता इतिहास काळाच्या पडद्याआड ; वयोवृद्ध खोखो संघटक मुकुंद आंबर्डेकर यांचे निधन

खोखोच्या प्रसार आणि प्रचारासाठी आयुष्य वेचणारे जेष्ठ खोखो संघटक गुरुवर्य मुपुंद विष्णू आंबर्डेकर यांचे बुधवारी त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.  निधनसमयी ते  90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा शशांक, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. खोखोचा चालताबोलता इतिहास म्हणून आंबर्डेकर यांच्याकडे पहिले जायचे. महाराष्ट्र खोखो संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे संस्थापक आणि अनेक वर्षे सचिव, कार्याध्यक्ष, हिंदुस्थानी खोखो महासंघाचे माजी सरचिटणीस, आशियाई खोखो फेडरेशनचे पाहिले सेव्रेटरी जनरल आणि संस्थापक अशा विविध माध्यमातून त्यांनी खोखोचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य केले. मेपॅनिकल आणि इलेक्ट्रीक अशा दोन शाखांचे ते मुंबईच्या व्हीजेटीआयचे पदवीधर होते. उत्कृष्ट संयोजक, व्यवस्थापक, संघटक  आणि कडक शिस्तीचे मार्गदर्शक म्हणून त्यांचा खोखो क्षेत्रात दरारा होता. क्रीडा भारतीचेदेखील ते सक्रिय कार्यकर्ते होते.