आलिया भट्टमुळे बदलले कियारा आडवाणीने तिचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवू़ड अभिनेत्री कियारा आडवानी हिने ‘कबीर सिंग’ चित्रपटानंतर स्वत:ची एक वेगळी ओळख तयार केली आहे. लवकर कियारा मल्टी स्टारर चित्रपट गुड न्युजमध्ये देखील दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये सध्या गाजत असलेल्या या अभिनेत्रीचे खरे नाव कियारा नसून तिने आलिया भट्टमुळे तिचे नाव बदलले आहे. कियारा हिचे खरे नाव आलिया आडवाणी आहे. मात्र बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने कियारा बॉलिवूडमध्ये दोन आलिया नको असे सांगत तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. कियाराने तिचे नाव बदलले असले तरी अद्यापही ती तिचे नाव कियारा आलिया आडवाणी असे लिहते.


View this post on Instagram

@amanbhakriphotography @ekalakhani @akankshagajria @mahesh_notandass

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

सलमानने कियाराला तिचे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. बॉलिवूडमध्ये आधीच एक आलिया भट्ट नावाची अभिनेत्री आहे त्यामुळे बॉलिवूडमध्ये दोन आलिया नको, असे सांगत सलमानने कियाराला तिचे नाव बदलायला सांगितले. सलमानचा हा सल्ला तिने मानत स्वत:चे नाव बदलले. सध्या कियारा ही देखील बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे बदललेले नाव कियाराला तरी फलदायक ठरले आहे. मात्र नाव बदल्यामुळे कियाराला सध्या सरकारी कामांमध्ये अडचणी येत आहेत.


View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियाराने स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, आधार कार्ड व पासपोर्ट वर माझे नाव आलिया आडवणी असे आहे. मी अद्याप पासपोर्ट वरील नाव बदलले नाही. त्यामुळे मला जेव्हा दुसऱ्या देशात जायचे असते तेव्हा एयरपोर्ट वर मला अनेक प्रश्न विचारले जातात त्यामुळे अनेकदा मला अडचणींना समोर जावे लागते. सरकारी कामातही अडचणी येतात आहे. त्यामुळे लवकरच मी पासपोर्ट व आधार कार्डवरील नाव बदलणार आहे.