
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चक्क गंडवले आहे. अण्वस्त्र नष्ट करण्याचे आश्वासन देणाऱ्या किम जोंगने जोरदारपणे अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम गुप्तपणे सुरूच ठेवला आहे. अमेरिकेच्या धमक्यांना भीक न घालता उत्तर कोरियाने डोंगरांमध्ये किमान 13 छुपे आण्विक तळ सुरू केल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेच्या थिंकटेकने याबाबतचा अहवाल दिला आहे. जूनमध्ये राष्ट्राध्यक्षा डोनाल्ड ट्रम्प आणि हुकूमशहा किम जोंग उन यांची सिंगापूर येथे शिखर परिषद होऊन ऐतिहासिक करार करण्यात आला. संपूर्ण अण्वस्त्र निशस्त्रकरण करण्याचे आश्वासन किम जोंगने दिले होते. ट्रम यांनीही उत्तर कोरिया अण्वस्त्र नष्ट करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगितले होते.
उत्तर कोरियाचे काही दिवसांपूर्वी एक मोठे अण्वस्त्र विकसीत करणारे तळ नष्ट केले होते; पण ही किम जोंग यांची खेळी होती हे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या एका सॅटेलाईट छायाचित्राद्वारे उत्तर कोरियाच्या डोंगरांमध्ये अत्यंत गुप्तपणे किमान 13 अण्वस्त्र निर्मिती तळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तळांची संख्या 20पर्यंत असू शकते असा अंदाज आहे. ट्रम्पबरोबरच्या बैठकीनंतर नवीन अण्वस्त्रांची चाचणी घेतली नाही; पण छुप्या पद्धतीने किम जोंगकडून अण्वस्त्र कार्यक्रम सुरू असल्यामुळे ट्रम्प यांना मोठा झटका मानला जात आहे. ट्रम्प यांच्या परराष्ट्र नितीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
summary- kim jong made fool of trump and didnt stop atomic bases of korea


























































