
सुंदर दिसण्यासाठी कोण काय करेल त्याचा काही नेम नाही. एका अमेरिकन टिव्ही स्टारने काही दिवसांपूर्वी तरुण दिसण्यासाठी विष्ठाही खाऊ शकते असे विचित्र विधान केले होते. त्याने ती चर्चेत आली होती. आता तिने सुंदर दिसण्यासाठी आणखी एक मोठं पाऊल उचलत वेदनादायी शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. तिने याबाबत फोटो शेअर करत इंस्टाग्रामच्या स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे.
किम कार्दशियनने तिच्या जीवनावर आधारित असलेल्या रिअॅलिटी शो मध्ये कबूल केले की, सुंदर दिसण्यासाठी ती वाटेल ते करु शकते. त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. किमने आपली फिगर मेण्टेन ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असते. यावेळी या सोशल मीडीया स्टारने एक वेदनादायी शस्त्रक्रिया केली आहे. ज्यामुळे तिचे पोट आत राहिल आणि ती कायम सडपातळ राहिल. त्याची माहिती या स्टारने इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर केली आहे. किमने आपल्या पोटाचे टाइटनिंग ट्रीटमेण्ट केली आहे.
फोटो शेअर करत किमने लिहीलेय की, हे एक गेम चेजर आहे. मी माझ्या पोटावर Morpheus Laser Treatment केली आहे. ज्यामुळे माझं पोट कडक राहिल. मला वाटतं ही माझी आवडती उपचारपद्धती असून ती वेदनादायी आहे, मात्र हे करण्याची क्षमता माझ्यात आहे. तरुण दिसण्यासाठी ती कोणत्याही वेदनेचा सामना करायला तयार आहे. किमने तिच्या संपूर्ण शरीराची तपासणी करुन घेतली आहे. ज्यामध्ये तिच्या हाडांची घनता, शरीराचे आकारमान, शरीरात किती चरबी आहे हे माहिती करुन घेतले आहे.
किम कर्दाशिया ही एक यशस्वी उद्योजक आहे. नुकतेच तिने आपला स्किनकेअर ब्रॅण्ड SKKN ची घोषणा केली आहे. किमच्या नव्या स्कीनकेअर लाईनमध्ये 9 उत्पादने आहेत. ज्यामध्ये क्लीनजर, टोनर, एक्सफोलिएटर, हाइलूरोनिक एसिड सीरम, फेसक्रीम, आयक्रीम, ऑइल ड्रॉप्स, नाईट ऑईलचा समावेश आहे.


























































