किनगावात विनाअनुदानित शिक्षकाचे भीक मागो आंदोलन

800

किनगाव येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केले. अठरा वर्षांपासून विनावेतन काम करत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अनुदान मिळण्यासाठी विविध आंदोलने केलेली आहेत. मुंबई येथे संघटनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे. त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी किनगाव येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी चक्क विद्यार्थ्यांना भीक मागण्याचा पवित्रा घेत भीक मागून पैसे गोळा केले आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी रेल्वेने रात्री रवाना होणार असल्याचे आंदोलनकर्ते प्रा. विष्णू पवार यांनी सांगितले.

या आंदोलनात प्रा. अभय गोरटे, प्रा. दयानंद सूर्यवंशी, प्रा.डॉ. ज्ञानेश्वर मुळे, प्रा. विठ्ठल कबीर, प्रा. राजेश गुट्टे, प्रा.डॉ. लक्ष्मण क्षीरसागर, ज्ञानेश्वर खिडसे आणि प्रा. विष्णू पवार सहभाग घेऊन शासन निर्णय होईपर्यत आझाद मैदान सोडणार नाही. अठरा वर्षापासून आमचा वेतनाचा प्रश्न प्रलंबीत आहे. अभी नही, तो कभी नही म्हणून आर्थिक समस्यात जगण्यापेक्षा प्रा. केशव गोबाडे, गोदिया यांनी आत्महत्या केली तसं आत्महत्या करणं पत्करू असं त्वेशाने ओरडून शासनाचा जाहीर निषेध केला.

आपली प्रतिक्रिया द्या