चाळीशीनंतर महिलांनी आहारात कोणता पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाळीशीनंतर महिला स्वतःच्या आरोग्याबाबत फार सजग होतात. चाळीशीनंतर महिलांमध्ये विविध शारीरिक बदल दिसून येतात. महिलांचे चयापचय पूर्वीसारखे वेगवान राहत नाही, स्नायू आणि हाडांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर मुख्य बाब म्हणजे हार्मोनल असंतुलन ही एक सामान्य समस्या बनते. अशा परिस्थितीत, फक्त कमी खाणे, डाएटिंग करणे किंवा व्यायाम करणे पुरेसे नाही. तर आपल्या आहारात योग्य पोषक तत्वांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

केसांना अतिप्रमाणात कंडिशनर लावल्याने काय नुकसान होते

महिला अनेकदा कार्बोहायड्रेट्स आणि फॅटवर लक्ष केंद्रित करतात, परंतु प्रथिनांकडे दुर्लक्ष करतात. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी त्यांच्या आहारात निश्चितपणे समाविष्ट करावे अशी भाजी म्हणजे सोयाबीनची भाजी. सोयाबीनच्या हिरव्या शेंगा बाजारात सहजसुलभ उपलब्ध असतात. या हिरव्या शेंगा महिलांसाठी रामबाण मानल्या जातात. म्हणूनच सोयाबीनच्या कोवळ्या हिरव्या शेंगा महिलांसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही. यामुळे हाडे मजबूत होतात तसेच उर्जा वाढते आणि हार्मोन्स संतुलित होतात.

प्रत्येक महिलेने त्यांच्या आहारामध्ये हिरव्या सोयाबीनच्या शेंगांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. यामुळे रजोनिवृती जवळ येताना फारसा त्रास होत नाही.

बटाट्याची साल काढून टाकत असाल तर, आजपासून ही चूक करु नका

सोयाबीनच्या शेंगा हार्मोनल संतुलन राखण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि लोहाची कमतरता दूर करण्यास मदत करते. त्यांच्या मते, वयानुसार महिलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांमध्ये योग्य पोषण महत्वाचे ठरते.

सोयाबीनच्या शेंगांमध्ये फायटोएस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. ते विशेषतः पेरीमेनोपॉज आणि रजोनिवृत्ती येणाऱ्या महिलांसाठी फायदेशीर असतात. रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजेनची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते. फायटोएस्ट्रोजेन संतुलन राखण्यास मदत करतात. मूड स्विंग आणि रजोनिवृत्तीशी संबंधित इतर लक्षणे देखील कमी करू शकतात.

उसाचा रस पिणे कुणी टाळायला हवे, जाणून घ्या

हाडे मजबूत करण्यास देखील सोयाबीनच्या शेंगा फार गरजेच्या ठरतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के मोठ्या प्रमाणात असते. रजोनिवृत्तीचा अनुभव घेणाऱ्या महिलांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. या काळात ऑस्टियोपोरोसिस (हाडे कमकुवत होणे) होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून, महिलांनी या काळात सोयाबीनचे सेवन निश्चितपणे करावे. यामुळे हाडांची घनता वाढते तसेच ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

सोयाबीनच्या शेंगांमध्ये फोलेटचा उत्कृष्ट स्रोत देखील आहे. जो अशक्तपणाने ग्रस्त असलेल्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला लोहाची कमतरता दूर करायची असेल तर तुमच्या आहारात सोयाबीनचा समावेश गरजेचा आहे. यामुळे दैनंदिन लोहाची गरज पूर्ण होण्यास मदत होते.