कोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सचा पदवीदान सोहळा उत्सहात पार पडला

कोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स (केसीपीएस) चा तिसरा पदवीदान सोहळा कुर्ला येथे पार पडला. या पदवीदान सोहळ्यात 2017 ते 2019 मध्ये उत्तीर्ण झालेल्या तब्बल 138 विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हल्ली मुली सगळ्याच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत ह्या सोहळ्यात देखील 17 विद्यार्थ्यांना विविध पदके देण्यात आली आणि त्यापैकी 13 पदके मुलींनी पटकावली आहेत. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून कोहिनूर रुग्णालयाचे उपसंचालक अतुल मोडक उपस्थित होते तर कोहिनूर रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. स्नेहल कंसारिया, केटीआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद वागासकर, केसीपीएसच्या व्यवसाय उत्कृष्टता मुख्य छाया खेडकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास फक्त डॉक्टरच झाले पाहिजे असे नाही तर उपवैद्यकीय अर्थात पॅरामेडिकल क्षेत्रातही अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. देशात तसेच परदेशांतही पॅरामेडिकलमधील तज्ज्ञांना मागणी आहे. पॅरामेडिकल स्टाफ हा प्रामुख्याने रुग्णांच्या शुश्रूषेचे काम करतो. त्यामुळे आरोग्य क्षेत्राचा हा कणाच म्हणायला हवा असे मत डॉ. स्नेहल कंसारिया यांनी व्यक्त केले.

सध्या रोगनिदान करण्यासाठी अनेक उपकरणे वैद्यकीय क्षेत्रात वापरली जातात. या उपकरणांना हाताळण्यासाठी तसंच अन्य विविध कामांसाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्तींची गरज असते. तसेच केसीपीएसच्या विद्यर्थ्यांना कोहिनूर रुग्णालयामार्फत Observership (निरीक्षण करण्याची संधी) देखील मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपकरणे हाताळण्याचा अनुभव सहजरित्या घेता येतो अशी माहिती छाया खेडकर यांनी दिली. तसेच इतर मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यंना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

आपली प्रतिक्रिया द्या