
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
मे महिना आणि लग्नसराईसाठी चाकरमानी कोकणात निघाल्यामुळे कोकण रेल्वेच्या गाड्यांना तोबा गर्दी झाली आहे. मिळेल त्या रेल्वे डब्यात शिरून घर गाठन्यापासून चाकरमानी धडपडत प्रवास करत आहे.
सुट्टी पडल्यामुळे चाकरमानी आपल्या पोराबाळांसहीत गावी येत आहे. त्यात मे महिन्यातील लग्नसराईसाठी येणाऱ्या पाहुण्या मंडळीची गर्दी होऊ लागल्याने कोकणात येणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस गाड्यांना तुफान गर्दी होत आहे. शनिवारी रात्रीच्या गाड्यांनाही प्रचंड गर्दी होती. अनेक चाकरमानी वेटिंग लिस्टवर लटकत प्रवास करत होते. एस.टी.विभागाने ५० हून अधिक जादा गाड्या सोडल्या आहेत. त्याचप्रमाणे खासगी ट्रव्हल्सवाल्यांचा धंदाही तेजीत आहे. कोकण रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्यामुळे चाकरमानी रेल्वेला प्रथम पसंती देत आहे.






























































