कोकण रेल्वे रुळावर भला मोठा दगड पडला, वाहतूक तीन तास ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्थानकाजवळील सुकीवली गावाजवळ रेल्वे रुळावर भला मोठा दगड आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. मात्र स्थानिक ग्रामस्थ, चिपळूण आणि रत्नागिरी येथून मदत मिळाल्यानंतर ट्रॅकवरचे दगड फोडून बाजूला करण्यात आले व कोकण रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली.

खेड रेल्वे स्थानकादरम्यान सुकीवली गावानजीक मोठा दगड शनिवारी रात्री बारा वाजता रेल्वे ट्रॅकवर आला होता. ही गोष्ट गस्ती घालणाऱ्या ट्रॅकमॅनच्या लक्षात आली व त्याने प्रसंगावधान दाखवले व याची माहिती कंट्रोल रूमला दिली त्या दरम्यान मुंबईतून रत्नागिरीकडे येणारी दादर – रत्नागिरी पॅसेंजर पडलेल्या दगडांपासून काही अंतरावर थांबवण्यात आली. ट्रॅकवरचा दगड बाजूला केल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

रेल्वे वाहतूक सुरळीत- उपेंद्र शेंड्ये
कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंड्ये यांनी सांगितले की, काल रात्री बाराच्या सुमारास सुकीवली जवळ रेल्वे रुळाशेजारी पडलेला दगड वीस मिनिटात बाजूला केला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली आहे.

summary- kokan railway stopped due to rock fallen on track