कोल्हापुरात छत्रपती शाहू कालीन ऐतिहासिक पॅलेस थेटर व सध्याचे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आज सायंकाळी मोठी आग लागली. आगीचे नेमके कारण कळले नसून अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोमच्या धर्तीवर साकारलेल्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान आणि शाहूकालीन पॅलेस थेटर म्हणून ओळखणाऱ्या व सध्याच्या संगीत सूर्य केशव भोसले नाट्यगृहाला आज सायंकाळी आग लागली.
कुस्ती मैदानाची व्यासपीठ जळून खाक झाले. संपूर्णपणे लाकडाचे असल्याने ही आग जोरात भडकली. या कुस्ती मैदानाला लागूनच केशव भोसले नाट्यगृह असल्याने त्यालाही आग लागली.
दरम्यान अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात मोठी गर्दी झाल्याने अडथळे निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.