
सायलेन्सर बदलून वाहन चालवणे, ट्रिपल सीट, कर्णकर्कश हॉर्न, हुल्लडबाजी करणाऱया वाहनचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईची मोहीम आखली आहे. बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस केलेल्या कारवाईत तब्बल 409 वाहनधारकांकडून 3 लाख 49 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.
वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत, बेशिस्त वाहन चालवणाऱयांचे प्रमाण वाढत आहे. विशेष करून तरुणवर्ग वाहनात बदल करून हॉर्न, सायलेन्सरची रचना बदलत असल्याने, इतर सर्वसामान्य वाहनधारकांना त्याचा त्रास हेत आहे. तर, काही कारचालक सीट बेल्टचा वापर करत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. यासाठी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस व पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱयांकडून दंडात्मक कारवाया सुरू केल्या जात आहेत.शहरात प्रवेश करणाऱया छत्रपती शिवाजी महाराज पूल, सर्व पोलीस ठाण्यासमोरील परिसर तसेच इतर चौकात थांबून पोलिसांनी ही कारवाई केली.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बनावट सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न असणाऱया 32 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, लक्ष्मीपुरीचे श्रीराम कन्हेरकर, राजारामपुरीचे होडगर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अशी झाली कारवाई
प्रकार केसेस दंड
ट्रिपल सीट 45 45 हजार
म्युझिकल हॉर्न 40 25 हजार
मोबाईलचा वापर 31 31 हजार
कर्णकर्कश हॉर्न 22 22 हजार
नो एन्ट्रीचे उल्लंघन 10 5 हजार
दारू पिऊन ड्रायEिव्हग 10 न्यायालयात
वाहनाचे मॉडिफिकेशन 11 11 हजार
लायसन्स जवळ नसणे 107 71 हजार
लायसन्स न काढणे 11 55 हजार
अल्पवयीन पालक 02 10 हजार
इतर केसेस 120 74 हजार
एकूण 409 3,49000


























































