मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असल्याचे दावे केले जात असतानाच, आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू सताना, कोल्हापुरात रिकाम्या खुर्च्या पहायला मिळाल्या. सकाळी नऊ वाजता सुरू होणारा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातून आलेल्या महिलांना मनस्ताप सहन करावा लागला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच जमलेल्या महिलांनी काढता पाय घेतला. त्यामुळे मोठ्या स्क्रीनवर मुख्यमंत्री भाषण ठोकत असताना समोर ऐकायला कोणीच नसल्याचे चित्र दिसुन आले.
पुण्यातून राज्य सरकारची महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला.येथील मार्केट यार्ड परिसरातील एका सभागृहात मोठ्या स्क्रीनवर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी जिल्ह्यातून लाभार्थी महिलांना गोळा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी केली गेली होती.सकाळी ९ वाजता होणारा हा कार्यक्रम दुपारी दिड नंतर सुरू झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरू झाले.पण मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना, राहीलेल्या महिलांनीही काढता पाय घेतला.त्यामुळे सभागृहातील मोकळ्या खुर्च्यासमोर स्क्रीनवर मुख्यमंत्री भाषण करत असल्याचे चित्र दिसत होते.