
सामना ऑनलाईन। कोलकाता
प्रियंकाजी, ही लोकशाही आहे. तुम्ही म्हटले म्हणून कुणी दुर्योधन होत नाही. त्यामुळे दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण हे 23 मे रोजीच समजेल, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रियंका गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. प्रियंका गांधी यांनी हरयाणातील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाभारतातील दुर्योधनाशी केली होती. त्यानंतर शहा यांनी पश्चिम बंगालमधील एका सभेत प्रियंका यांच्यावर पलटवार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान यांना भ्रष्टाचारी नंबर वन असे संबोधले होते. त्यानंतर काँग्रेसकडूनही मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. प्रियंका गांधी यांनी मोदी यांना अहंकारी म्हटले आहे. या देशाने अहंकारी लोकांना कधीच माफ केले नाही, असे म्हणत प्रियंका यांनी मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शहा यांनीही प्रियंका यांना दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण हे 23 मे रोजीच कळेल असे प्रत्युत्तर दिले.


























































