कोलकाता मेट्रोमध्ये आग, डझनभर प्रवाशांची सुखरुप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोलकाता

कोलकाता मेट्रोला आग लागली असून अनेक डब्यांमध्ये धुराचे लोट उठले आहेत. धुरामुळे अनेक प्रवासी डब्यात अडकले आहेत. दरम्यान अग्नीशमन दलाच्या जवानांनी  डझनभर प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले आहे. रवींद्र सदन आणि मैदान स्थानकादरम्यान मेट्रोला आग लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप समजले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मेट्रोला आग लागताच स्थानकावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी पेटलेल्या डब्यांवर पाण्याचा मारा केला. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी व कर्मचाऱ्यांनी डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी धुरामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वप्रवासी सुखरुप असल्याचे कोलकाता मेट्रोच्या जनसंपर्क प्रमुखांनी सांगितले आहे. तर आग लागल्यानंतर अर्ध्या तासांनी मदत मिळाल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.