गोरेगावमध्ये गुरुवारपासून ग्लोबल कोकण महोत्सवाची धूम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गोरेगावच्या मुंबई एक्झिबिशन सेंटरमध्ये कोकणचे वैभव अवतरणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र इको टुरिझम बोर्ड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने भव्य ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. गुरुवार 3 जानेवारीपासून गोरेगाव पूर्व येथील मुंबई एक्झिबिशन सेंटर येथे सुरू होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

चार दिवस चालणाऱ्या या ग्लोबल कोकण महोत्सवात नागरिकांना कोकणची लोककला, खाद्य संस्कृती, पर्यटन स्थळांचा नजराणा अनुभवता येणार आहे. तसेच कृषी परिषद, मत्स्य उद्योग संमेलन, पर्यटन उद्योग संमेलन, कृषी उद्योग संमेलन, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिह्याबाबतचे व्हिजन आदी कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चार दिवस चालणारा कोकण महोत्सव म्हणजे मुंबईकरांसाठी पर्वाणीच ठरणार आहे.