दापोलीत एकाला 55 हजाराचा ऑनलाईन चुना

296
प्रातिनिधीक फोटो

दापोलीत बजाज फायनान्सच्या नावाने एटीएम आणि ओटीपी नंबर मागून एका भामट्याने एका व्यक्तीला 55 हजारांचा चुना लावला आहे. रतिष रमेश साळुंखे याच्या खात्यातून ही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आली.

रतिष यांना एकाने मोबाईल कॉल केला होता. मी राकेश शर्मा बोलतोय, बजाज फायनान्सचे चार हजार रुपये जास्त जमा झाले आहेत.ते परत करायचे आहेत असे सांगून त्याने रतिष यांचा एटीएम आणि ओटीपी नंबर मागितला. त्यानंतर पुन्हा त्याने कॉल करून एटीएम अॅक्टीव्हेट होत नसल्याचे सांगून दुसरा एटीएम नंबर घेतला. त्यानंतर ओटीपी नंबर मागून पंजाब नॅशनल बॅंकेच्या दापोली गिम्हवणे शाखेतील खात्यातून भामट्याने 55 हजार रुपये काढले.

आपली प्रतिक्रिया द्या