महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तीन गाव अंधारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। आरवली

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी , राजिवली व रातांबी या तीन गावे अंधारात बुडाली आहेत. या गावांना आरवली फिडर अंतर्गत वीजपुरवठा करण्यात येतो. असे असले तरी येथे वीज पुरवठा अनियमित होत असल्याने या गावात वीजेचा लंपडाव सुरू आहे. याप्रकरणी तीन गावातील ग्राहकांनी अनेक वेळा महावितरणाकडे वीजुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. मात्र उपअभियंते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
यामुळेम हावितरण विभागाने विद्युत लाईनचे काम गणेशोत्सवापुर्वी करावे गणपती काळात ग्राहकांना पुरेशी विज उपलब्ध करुन द्यावी अन्यथा थेट महावितरणच्या जिल्हा कार्यालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा उपसरपंच तुकाराम येडगे व सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटोळे यांनी दिला आहे.

आरवली फिडर अंतर्गत येणा-या कुटगिरी, राजिवली व रातांबी या तीन गावांची मिळून एकच गृपग्रामपंचायत असून या तीन गावांची साधारण १७०० लोकसंख्या आहे .येथील विज ग्राहकांना महावितरण विभागाकडून उपयुक्त सेवा मिळावी ही अपेक्षा असताना ग्राहकांच्या अपेक्षांना महावितरण उपअभियंता हरताळ फासत आहेत. दहा दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्साव असाच विजेचा लपंडाव सुरु राहील्या स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.