कणकवलीतील शेर्पेगावाने कोरोनाला वेशीबाहेर ठेवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोनमध्ये पोहोचला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली तालुका तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहे. अनेकवेळा जिह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या कणकवली तालुक्यात आढळून आली आहे. ग्रामीण भागही कोरोनाच्या लपेटय़ात आहे. असे असताना कणकवली तालुक्यातील शेर्पे गावाने या कोरोनाच्या विषाणूवर विजय मिळवून दाखवला आहे.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या शेर्पे गावाची लोकसंख्या 894 असून 232 कुटुंबे आणि 7 वाडय़ा आहेत. या गावाने कोरोना लढय़ात मोठा आदर्श जिह्यासमोर ठेवला आहे. कोरोनाची दुसरी लाट साधारण मार्च 2021 पासून सुरू झाली. पहिल्या लाटेत अगदी सुरक्षित असणारा जिल्हा दुसऱया लाटेत मात्र पुरता खंगून गेला. असे असताना याच कणकवली तालुक्यातील शेर्पे गाव कोरोनाशी यशस्वीपणे झुंजला आणि कोरोनाला वेशीबाहेरच ठेवले. ग्रामदैवत श्री काळेश्वरीच्या चरणी नतमस्तक असलेल्या या गावाने एकमताने राजकीय, सामाजिक, आर्थिक मतभेद विसरून प्रामाणिकपणे या लढय़ात झोकून दिले आणि गावाला सुरक्षित ठेवले. कोरोनाचा फटका जिह्यातील अनेक गावांना बसत असताना शेर्पे गावाने आपल्या एकजुटीमुळे कोरोनाचा धोका टाळला.

गावाचा सहभाग मोठा…

लोपं नियमांचे काटेकोरपणे पालन करतायत. मास्कचा वापर करतायत. सोशल डिस्टन्सिंग पाळतायत. गावच्या सरपंच निशा भास्कर गुरव, उपसरपंच अरुण ब्रह्मदंडे, पोलीसपाटील शेलार, ग्रामसेवक मोहन माने तसेच सर्व ग्राम संनियंत्रण समिती सदस्य हे प्रामाणिकपणे काम करतायत. शाळा, बसस्टॉप, किराणा मालाची दुकाने, मंदिरे अशा सर्व ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. परजिह्यातून गावात येणाऱया ग्रामस्थांनी नियमांचे उल्लंघन कधी केले नाही. मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, हात धुणे अशा पायाभूत गोष्टी सर्वांनी प्रामाणिकपणे पाळल्या. गावातच आरोग्य उपपेंद्र असल्यामुळे त्याच ठिकाणी ग्रामस्थांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे प्रवासातून होणारा संसर्ग टळला आहे. त्यामुळेच कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात शेर्पे गावाला यश आले आहे.