
कोपरगाव येथे दरम्यान गेल्या आठ दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या त्या 14 जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. 14 पैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर फुलसौंदर म्हणाले, 14 संशयितांचे नमुने आठ-दहा दिवसांपूर्वी नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या 14 अहवालांपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले तर उर्वरित 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर कोपरगाव कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सुरेगाव संपर्कातील 84 जणांची रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट करण्यात आली, यात फक्त एक 45 वर्षांची एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. तर उर्वरित 83 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. शनिवारी आलेल्या अहवालात 3 पॉझिटिव्ह 11 निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी शामवाडी येथील 1 पुरुष कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदर इसम हा पुण्याहून 15 जुलै रोजी येथे आला होता. शनिवारी एकूण चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या एस. एस. जी. एम. कॉलेज मधील कोवीड सेंटरमध्ये 15 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत, असेही डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.
दरम्यान कोवीड सेंटर मध्ये 48 जण होम क्वारंटाईन असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे.
































































