कोपरगाव बस अपघातात एक ठार, एक जखमी

768
accident

गुजरात राज्यातील शिर्डीकडे निघालेल्या एसटी बसने शुक्रवारी रात्री मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वराचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे.

शुक्रवारी 24 रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास नगर मनमाड मार्गावरून कोपरगावकडे गुजरात राज्यातील एसटी बस क्रमांक जी. जे. 18 झेड 4111 चालली होती. वाटेत या एसटीने खिर्डी गणेश शिवारात खिर्डी गणेश फाट्याजवळ कोपरगावकडे चाललेल्या बजाज डिस्कवर (एमएच-17 ए.टी. 7557) धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील सचिन ज्ञानदेव भिंगारे (34) राहणार करंजी तालुका कोपरगाव यांचा मृत्यू झाला.

दुचाकी मोटरसायकलवरील प्रकाश पुंजा वाणी (रा. नांदुर्खी तालुका, राहाता) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची फिर्याद कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला बाळासाहेब नामदेव भिंगारे (45) राहणार करंजी बुद्रुक यांनी दिली असून सदर फिर्यादीवरून पोलिसांनी गुजरात बस चालक याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अपघात होताच बसचालक व सोडून पळून गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या