
>>शेफ विष्णू मनोहर
साहित्य – 2 वाटय़ा कोथिंबीर, 2 चमचे आलं-लसूण, मीठ, चवीनुसार साखर, 1 चमचा आमचूर पावडर, हिंग, पाव चमचा हळद, 3 वाटय़ा बेसन.
कृती – सर्वप्रथम आलं-लसूण पेस्ट फोडणीला घालून त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आमचूर पावडर, साखर, हिंग घालून परतून घ्या. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर थोडे परतल्यावर त्यामध्ये 4 वाटय़ा पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यावर बेसनाची पेस्ट घाला. नंतर एकत्र करून थोडी वाफ आल्यावर हे मिश्रण एका ट्रेमध्ये थापून थंड करा. नंतर त्याच्या वडय़ा पाडून तळून खायला द्या.





























































