
पूर्ववैमनस्यातून सराईताने तरुणावर सतूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री कोथरूडमधील केळेवाडी पौड रस्त्यावर घडली.
याप्रकरणी पोलिसांनी अमोल रमेश गोडांबे (वय 31) याला अटक केली आहे. आकाश परदेशी असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याची आई सविता राजेंद्र सिंग परदेशी (वय 52) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविता यांचा मुलगा आकाश काल मध्यरात्री केळेवाडी पौड रस्त्यावर थांबला होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी अमोल गोडांबे याने आकाशला ‘तुला आज खल्लास करीन, जीवे ठार मारणार आहे’ असे म्हणत त्याच्या डोक्यात सतूरने वार केले. परिसरात दहशत पसरवत अमोल निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. कोथरूड पोलीस तपास करीत आहेत.



























































