
देशात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे. 12 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील मुलांसह प्रौढांच्या लसीकरण मोहिमेत सिरम इन्स्टिटय़ूटच्या कोवोव्हॅक्स लसीचा समावेश केला जाणार आहे. राष्ट्रीय कोरोना लसीकरण सल्लागार समितीने याबाबत शिफारस केली आहे. याआधी औषध नियामकने 12 ते 17 वयोगटासाठी कोवोव्हॅक्सचा आपत्कालीन वापर करण्यास सशर्त मंजुरी दिली होती. सिरम इन्स्टिटय़ूटने अलीकडेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला यासंदर्भात विनंती केली होती.





























































