उन्हाच्या झळांनी ‘क्रेग मार्टिन’ला भोवळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, निफाड

उष्णतेमुळे डिहायड्रेशन झाल्याने बेशुद्ध पडलेल्या दुर्मिळ जातीच्या क्रेग मार्टिन या पक्ष्याला जीवदान देण्यात यश आले आहे. निफाड येथे सकाळी 10 च्या दरम्यान गाजरवाडी येथील हभप साहेबराव महाराज इरोळे यांना एका दुकानात एक दुर्मिळ जातीचा पक्षी बेशुद्धावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ या पक्ष्याला सकाळी 10 च्या दरम्यान निफाड येथील पक्षीमित्र डॉक्टर उत्तम डेर्ले यांच्या दवाखान्यात आणले. सदर बेशुद्धावस्थेतील पक्षी हा दुर्मिळ जातीचा क्रेग मार्टिन असल्याचे डेर्ले यांच्या लक्षात आले.

सदर पक्षाला अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या पक्ष्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केल्यानंतर या पक्ष्याने पाणी पिले. त्यानंतर डेर्ले यांनी गार पाण्यात त्याचे शरीर भिजवले. त्याला बाजरीचे दाणे खाऊ घातले, इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी पाजले. त्यानंतर बराच वेळ कुलरची थंड हवा देऊन त्याच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा पक्षी चांगल्याप्रकारे सावध झाला. त्यानंतर या पक्ष्याने डेर्ले यांच्या दवाखान्यातून बाहेर येत स्वतःहून आपल्या अधिवासात उड्डाण केले. या पक्ष्याला जीवदान देणारे हभप साहेबराव महाराज इरोळे, डॉ. उत्तम डेर्ले यांचे कौतुक होत आहे.

पक्षीमित्रांमुळे मिळाले जीवदान
सदर क्रेट मार्टिन या पक्ष्याचे वास्तव्य हे नांदूरमधमेश्वर बंधाऱयाच्या भिंतीजवळ असते. या परिसरात त्याचा वावर दुर्मिळ आहे. माझ्याकडे कोणी जखमी अवस्थेतील पक्षी घेऊन आल्यास त्याला वाचवण्यासाठी मी नेहमी सहकार्य करतो. अतिउष्णतेमुळे पक्ष्यांना डिहायड्रेशनचा त्रास होण्याची धोका वाढल्याने नागरिकांनी घराच्या बाहेर, घराच्या, इमारतीच्या उंच ठिकाणी छोटय़ा भांडय़ात पाणी ठेवून पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी व पक्ष्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न करावा.