सामना प्रतिनिधी। कुडाळ
कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघ व सावंतवाडी मतदार संघात युवासेनेत काम करण्यास इच्छुक असणा-या युवक व युवती यांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.
कुडाळ शिवसेना शाखा येथे रविवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत युवासेना कोअर कमिटी मार्फत या मुलाखती घेतल्या जातील. तसेच सोशल मिडियावर शिवसेना पक्षासाठी काम करण्यास इच्छुक युवक व युवतींनीही यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केले आहे.































































