Kupwara Encounter: कुपवाड्यात पाच पाकिस्तानी दहशतवादी ठार, लष्कराची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत शुक्रवारी पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. एका विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीर जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील जुमागुंड भागात कारवाई सुरू केली, ही कारवाई सुरु असताना सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी नोटा आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. परिसरात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दहशतवादी लपल्याची बातमी लष्कराला मिळाली, त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, स्वत:ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाच पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले.