कुर्ल्यात घराचा भाग अंगावर कोसळून महिला जखमी, भांडुपमध्ये अंगावर झाड पडून दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला पश्चिम पत्रा चाळ येथे शनिवारी दुपारी घराचा भाग अंगावर पडल्याने महिला जखमी झाली. जखमी महिलेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर भांडुप येथे अंगावर झाड पडल्याने दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या.

कुर्ला पश्चिम येथील पत्रा चाळ, मावळेनगर येथे एक मजला असलेल्या घराचा भाग कोसळून सविता अडांगळे (३५) या महिला जखमी झाल्या. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे. भांडुप पश्चिम येथील बालाजी हाईट इमारत (35), गावदेवी रोड शनिवारी दुपारी स्कॉलीन मायकेल (10) व लार्सन (17) या दोघांच्या अंगावर पडल्याने ते किरकोळ जखमी झाले. दोघांवर खासगी रुग्णालयात करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने दिली.