लालूंचा शिस्तीचा बडगा! तेज प्रतापची पक्षातून हकालपट्टी, कुटुंबातूनही बेदखल

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी मोठा मुलगा तेज प्रताप यादव याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले असून कुटुंबातूनही बेदखल केले आहे. बेजबाबदार वर्तन आणि काैटुंबिक मूल्ये तसेच सार्वजनिक जीवनातील शिष्टाचारापासून तेज प्रताप विचलीत झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. तेज प्रताप यादव यांनी शनिवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी अनुष्का यादव नामक महिलेशी प्रेमसंबंध असून 12 वर्षांपासून आपण एकत्र असल्याचा दावा केला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ही पोस्ट हटवली. मात्र या पोस्टमुळेच तेज प्रताप यांच्यावर लालूंनी शिस्तीचा बडगा उगारला.