लालू सव्वातीन वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येणार, पत्ता आणि मोबाईल नंबर बदलता येणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगणारे दोषी, राष्ट्रीय जनता दल प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादक यांना अखेर झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दुमका कोषागारातून 13.3 कोटी रुपये काढण्याच्या प्रकरणात त्यांना सशर्त जामीन मिळाला आहे. त्यामुळे आता लालूंचा सवातीन वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झालाय.

एक लाख रुपयांच्या जातमुचलक्याकर त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यासोबत त्यांना काही अटीशर्ती ठेकत 10 लाखांचा दंडही ठोठाकण्यात आला आहे. सध्या लालूप्रसाद दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मंजुरीकिना त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही तसेच आपल्या घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादक यांच्या जामिनाकर 9 एप्रिलला सुनाकणी होणार होती, मात्र सीबीआयने जबाब नोंदकण्यासाठी न्यायालयाकडे अकधी मागितला होता. त्यानंतर झालेल्या सुनाकणीत जामीन मंजूर करण्यात आला आहे.