
जम्मू कश्मीर भागात आणि कोणीही जमीन विकत घेऊ शकतो. तसेच राज्यात कोणीही स्थायिक होऊ शकतो. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक परिपत्रक जारी करून हा निर्णय जाहीर केला आहे. असे असले तरी शेतजमीन विकत घेण्यावर अजूनी बंदी आहे.
With notification of UT of Jammu and Kashmir Reorganisation (Adaptation of Central Laws) Third Order, 2020, twelve state laws have been repealed as a whole out of the 26 others adapted with changes and substitutes. https://t.co/JeBB5UvdbZ
— ANI (@ANI) October 27, 2020
जम्मू कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात उद्योजकता वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आली आहे. फक्त शेत जमीन ही राज्यातेले नागरिकांसाठी राखीव असेल अशी सिन्हा यांनी यांनी नमूद केले.
यापूर्वी जम्मू कश्मीरमध्ये फक्त स्थानिकांना जमीन खरेदी करण्याचा अधिकार होता. आता नवीन नियमानुसार देशातील इतर नागरिकांनाही हा अधिकार मिळणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू कश्मीर पुर्नरचना नियमांनुसार हा निर्णय घेतला आहे. आता कुठल्याही हिंदुस्थानी नागरिकाला जम्मू कश्मीरमध्ये उद्योगासाठी जमीन घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. तसेच याचा फायदा स्थानिकांनाही होणार आहे.
गेल्य वर्षी जम्मू कश्मीरचे कलम 370 हटवण्यात आले होते. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू कश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाला होता. एक वर्षानंतर कायद्यात बदल करण्यात आला आहे.
























































