
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट आता संगनमताने भ्रष्टाचार करू लागला आहे. पंढरपूर-मोहोळ पालखी मार्गावर सोलापूरमधील भाजप नेते रमेश माने आणि एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरण चौरे यांनी अधिकाऱयांना हाताशी धरून अवघ्या दोन किलोमीटर क्षेत्रातील जमिनीतून भूसंपादनाच्या नावाखाली 1400 कोटी रुपये लाटल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी आज केला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे दाखवली. या प्रकरणातील पीडित शेतकरी मारुती सुखदेव माने यांनाच अंधारे यांनी पत्रकार परिषदेत आणले होते. माने यांची जमीन या प्रकल्पात जाऊनही त्यांना मोबदला दिला गेला नाही, असे त्या म्हणाल्या.

























































