साडेतीन तासानंतर मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक वाहतूक धीम्या गतीने सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, महाड

मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ केंबुर्ली गावापूर्वी मोठी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जवळपास साडेतीन तासानंतर रस्त्यावर आलेली माती, दगड दूर करण्यात आले असून वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली आहे.  दरड कोसळल्याने या मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

mumbai-goa-landslide

कोकण किनारपट्टी भागामध्ये गेले तीन दिवस सतत पाऊस पडतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे ही दरड कोसळल्याचं आमच्या स्थानिक प्रतिनिधीने सांगितले आहे. वाहतूक बंद झाल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले .