सोव्हिएत युनियनचे नेते मिखाईल गोर्बाचेव यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त सोविअहएत युनियनचे अखेरचे राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. अमेरिकेसोबत कित्येक वर्षे सुरू राहिलेले शीतयुद्ध संपवण्यात त्यांनी सक्रिय पुढाकार घेतला होता. ते सोव्हिएत युनियनचे वजनदार नेते होते. कम्युनिस्ट राजवटीत सुधारणा घडवून त्यांनी मुक्त विचारसरणीचा पुरस्कार केला. सरकार लोकशाही मार्गाने चालावे, त्यात सामान्य जनतेला स्वातंत्र्य असावे अशा मताचे ते होते. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोर्बाचेव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.