पंतप्रधान मोदींना लता मंगेशकर पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच 24 एप्रिल रोजी सायंकाळी षण्मुखानंद हॉल येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आज पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली.

राहुल देशपांडे, आशा पारेख, जॅकी श्रॉफ यांना ‘दीनानाथ पुरस्कार’

संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीकरिता राहुल देशपांडे यांना यंदाचा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेबद्दल ‘आनंदमयी’ पुरस्कार मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट) यांना तर सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार ‘संज्या छाया’ ला जाहीर झाला आहे.