लता मंगेशकर रुग्णालयातून परतल्या, मानले चाहत्यांचे आभार

664

गेल्या 28 दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर या घरी परतल्या आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. घरी परतल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

आपल्या ट्वीटमध्ये लता दीदी म्हणाल्या की, नमस्कार, मी गेल्या 28 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात होते. मला न्यूमोनिया झाला होता. मी संपूर्ण बरी झाल्यानंतर घरी जावे अशी डॉक्टरांची इच्छा होती. परमेश्वर, माई-बाबांचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचे प्रेम, प्रार्थनांमुळे मी आता बरी आहे. मी तुम्हाला सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानते, असं ट्वीट लता दीदींनी केलं आहे.

आपल्या प्रकृतीची काळजी घेणाऱ्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांचेही दीदींनी आभार मानले आहेत. डॉ. प्रतीत समदानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. जरीर उद्वाडिया, डॉ. निशित शाह, डॉ. जनार्दन निम्बोलकर आणि राजीव शर्मा यांचे तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे त्यांनी आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या