‘भारतरत्न’ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून आपण लतादीदींच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. दीदींच्या प्रकृतीबद्दल सर्वच क्षेत्रातून विचारपूस होत असल्याने रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी वेळोवेळी त्यासंदर्भातील माहिती दिली पाहिजे असे आपण सांगितल्याचे टोपे यांनी सांगितले. मंगेशकर कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर रुग्णालयाचे अधिकारी लतादीदींच्या प्रकृतीबद्दल माहिती देऊ शकतात, असेही टोपे म्हणाले.






























































