लातूरकरांसाठी गुरुवार ठरला दिलासादायक, तपासणीसाठीचे सारे अहवाल आले निगेटीव्ह

743
लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी गुरुवार  अत्यंत दिलासादायक असा दिवस ठरला आहे.  दि.4 जून रोजी तपासणी केलेले 28 अहवाल निगेटिव्ह आले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 04.06.2020 रोजी लातूर जिल्हयातील एकूण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 27 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  सर्वच 27   व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथून एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल  निगेटीव्ह आला आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 28  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले  आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
आपली प्रतिक्रिया द्या