
लातूर मधील अहमदपूर शहरातील लेक्चर कॉलनी भागातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 55 हजार रुपयांचा ऐवज पळवण्यात आला.
मिनाक्षी दिपक शिंगडे आणि त्यांचे पती हे कामानिमित्त लातूर येथे गेले होते. अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे कुलूप तोडून कपाटातील चांदीचे दागिने अर्धा किलोचे किंमत 30 हजार रुपये आणि सोन्याचे कानातील 4 ग्रॅमचे किंमत 20 हजार रुपये आणि रोख रक्कम 5 हजार असा सुमारे 55 हजाराचा ऐवज चोरुन नेला. अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कर्मचारी बडे हे करीत आहेत.
























































