लातूर जिल्ह्यात 408 ग्रामपंचायतीसाठी 6688 उमेदवार रिंगणात, 25 ग्रामपंचायती बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामंपचायतीसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणूकीमध्ये 6688 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 2239 उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतलेले आहेत. जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायती बिनविरोध निघालेल्या असून 202 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत.

लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. 408 ग्रामपंचायतीसाठी छाननीनंतर 9973 उमेदवारी अर्ज वैध ठरलेले होते. त्यामधील 2239 उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले. निवडणूकीच्या रिंगणात सध्या 6688 उमेदवार राहिलेले आहेत. जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात यश आलेले असून त्यामधील 202 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत.

लातूर तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीसाठी 1329 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यातील केवळ 2 ग्रामंपचायती बिनविरोध निघालेल्या आहेत. औसा तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीसाठी 920 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यातील केवळ 1 ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात यश आलेले आहे.

रेणापूर तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीसाठी 482 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रेणापूर तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध निघालेली आहे. निलंगा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीमध्ये 123 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तालूक्यातील 4 ग्रामपंचायती बिनविरोध निघालेल्या आहेत. देवणी तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीसाठी 490 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तालूक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे.

अहमदपूर तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी 709 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यातील जिल्ह्यात सर्वाधिक 7 ग्रामपंचायती बिनविरोध निघालेल्या आहेत. चाकूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी 479 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तालूक्यातील 2 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत.

उदगीर तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीसाठी 1191 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तालूक्यातील 6 ग्रामपंचायती बिनविरोध निघालेल्या आहेत. जळकोट तालुक्यातील 27 ग्रामपंचायीसाठी 489 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. तालूक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध निघालेली आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीसाठी 476 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तालूक्यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध निघालेली नाही.